CIDCO Housing Scam: 'जे घर ३५ लाखाला बनतं ते ७४ लाखाला विकतात', CIDCO कडून सर्वसामान्यांची लूट?

Continues below advertisement
नवी मुंबईतील वाशी आणि खारघर परिसरात सिडकोच्या (CIDCO) गृहनिर्माण योजनेतील घरांच्या अवाच्या सवा किंमतींमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. 'जे घर पस्तीस लाखाला बनतं ते घर हे चौऱ्याहत्तर लाख दहा हजारला विकतात,' असा आरोप करत, माहिती अधिकारात (RTI) हि धक्कादायक माहिती समोर आल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे, आमदार, खासदार आणि सनदी अधिकाऱ्यांसाठी उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पातील घरांच्या किंमती सर्वसामान्यांसाठीच्या घरांपेक्षा कमी असल्याचेही समोर आले आहे. परवडणाऱ्या घरांच्या (Affordable Housing) नावाखाली सिडको १०० ते १२० टक्के नफा कमवत असल्याचा आरोप होत आहे. अनेक नागरिकांनी या महागड्या घरांकडे पाठ फिरवली असून, प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola