Sindhudurga Vinayak Raut: शिवसेनेमुळेच स्पर्धांना हिरवा कंदील- विनायक राऊत ABP Majha
तळकोकणात दहा वर्षानंतर बैलगाडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे या बैलगाडी स्पर्धेत मोठ्या संख्येने शेतकरी या स्पर्धेत सहभाग घेत आहेत. केवळ शिवसेनेच्या खासदारांवर बैलगाडी स्पर्धा सुरू झाल्याचं वक्तव्य शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी यावेळी केलं. केंद्र सरकारकडे सातत्याने चार वर्ष पाठपुरावा केल्यानंतरच बैलगाडी स्पर्धेतला सर्वोच्च न्यायालयाने शेतकऱ्यांच्या हितासाठी काही अटी आणि शर्तीवर बैलगाडी स्पर्धा सुरू करण्यास परवानगी दिली. म्हणूनच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मोठ्या संख्येने बैलगाडी स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. शिवसेना शेतकऱ्यांना आवश्यक असणारी बाब म्हणजे बैलगाडी स्पर्धा सुरू करण्यात यशस्वी झाली. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी लहानपणी आठ ते दहा किलोमीटर बैलगाडी चालवल्याच्या आठवणींना यावेळी उजाळा देत आज बैलगाडी चालवताना त्यांना लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.