Sindhudurga Bank Election : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची आज मतमोजणी,वर्चस्वासाठी राणेंची प्रतिष्ठा पणाला
Continues below advertisement
सिंधुदुर्गात गेले काही दिवस ज्याच्यासाठी राजकीय संघर्ष पाहायाला मिळाला, त्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी आज होतेय. शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखालील भाजपचं पॅनल यांच्यात हा वर्चस्वाचा सामना आहे. त्यात कोण बाजी मारणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. तर दुसरीकडे शिवसैनिकावर झालेल्या हल्ला प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयानं जामीन फेटाळल्यानं नितेश राणे आज हायकोर्टाचे दरवाजे ठोठावण्याची शक्यता आहे. त्यामुळे नितेश राणेंवर अटकेची तलवार कायम आहे. या पार्श्वभूमीवर राणे आणि पोलिसांच्या भूमिकेकडेही लक्ष लागलंय.
Continues below advertisement