Sindhudurg : सिंधुदु्र्ग जिल्ह्यात कामगारांच्या वारसांना नियुक्त्या देण्यावरून शिवसेना-भाजपमध्ये वाद
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत सत्ताधारी व विरोधकां मध्ये आज जोरदार खडाजंगी झाली. शिवसेनेचे सदस्य आक्रमक झाल्यानंतर सत्ताधारी भाजपचे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व सदस्य ही आक्रमक झाले आणि जोरदार खडाजंगी झाली. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अंतर्गत सध्या गाजत असलेल्या वॉटर प्युरिफायर खरेदी गैरव्यवहार आणि सफाई कामगारांच्या वारसांना चुकीच्या पद्धतीने नियुक्त्या दिल्याने कर्मचारी निलंबन प्रकरणावरून वाद झाला. दोन्ही कडील सदस्य आक्रमक झाल्याने काही काळ स्थायी सभेतील वातावरण तणावाचे बनले होते. अखेर जिल्हापरिषदेच्या अध्यक्षांनी चौकशी मध्ये दोषी आढळणा-यांवर कारवाई होणारच असे सांगून वादावर पडदा टाकला. मात्र या खडाजंगीची चर्चा सिंधुदुर्गात सर्वत्र केली जात आहे.