Sindhudurga Rathotsav : महाशिवरात्री निमित्त सिंधुदुर्गात रथोत्सवाचं आयोजन
Continues below advertisement
Sindhudurga Rathotsav : महाशिवरात्री निमित्त सिंधुदुर्गात रथोत्सवाचं आयोजन
कलेचा वारसा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मधील नेरूर गावचं ग्रामदैवत कलेश्वर मंदिरात रात्री २ वाजता रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाशिवरात्री च्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही शकराच्या मंदिरात रथोत्सव साजरा केला जातो. लाकडी रथ आकर्षक फुलांनी सजविला जातो. महाशिवरात्रीच्या मध्यरात्रीनंतर श्रींची मूर्ती रथात विराजमान करून रथातून मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीदरम्यान भाविकांच्या अलोट गर्दी उसळली. मिरवणुकीसाठी वापरण्यात येणारा रथ पूर्णपणे लाकडी, कोरीव कामयुक्त, पाच मळ्यांचा आहे. मिरवणुकीची परिक्रमा पहाटेपर्यंत सुरू होती.
Continues below advertisement