Sindhudurg Rain : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून संततधार ; प्रमुख नद्यांनी इशारा पातळी ओलांडली
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात आज आणि उद्या हवामान विभागाने ऑरेंज जारी केला आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. वैभववाडी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ले, दोडामार्ग तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धबधबे प्रवाहित झाले आहेत. जिल्ह्यात गेल्या 24 तासात 105 मी. मी. पावसाची नोंद.