Sindhudurg | राज्याच्या सीमांवर कोरोनाची नाकाबंदी; महाराष्ट्र गोवा सीमेवरून कोरोना तपासणीचा आढावा
गोव्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची स्क्रीनिंग टेस्ट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा तपासणी नाक्यावर केली जात आहे. सकाळी 10.30 वाजल्यापासून ही तपासणी सुरू केली असून आतापर्यंत 500 प्रवाशांची स्क्रीनिंग टेस्ट केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांदा, दोडामार्ग, सातार्डे, आरोंदा, आयी या ठिकाणी जिल्हा प्रशासनातर्फे स्क्रीनिंग टेस्ट केली जात आहे. यासोबतच कोकण रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची स्क्रीनिंग टेस्ट केली जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन महाराष्ट्र गोवा सीमेवरून आमचे प्रतिनिधी सदाशिव लाड यांनी घेतलेला आढावा.
Tags :
Corona Check Point Corona Nakabandi Sindhudurg RT-PCR Negative Test Report Maharashtra COVID-19 Corona Guidelines RT PCR Maharashtra Government Corona Maharashtra