Sindhudurg : Nitesh Rane यांना जामीन मिळणार की अटक होणार? न्यायालयाच्या निर्णयाकडे नजरा ABP Majha
Continues below advertisement
सिंधुदुर्गात जिल्हा बँकेच्या निवडणुकीआधी राजकीय घमासान सुरु आहे आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांना जामीन मिळणार की अटक होणार? याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. त्यांच्या जामीन अर्जावर सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालय आज निर्णय देणार आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्हा बँकेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत नारायण राणेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपचं पॅनल आमनेसामने आहे. सिंधुदुर्गातील या राजकीय घडामोडींकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
Continues below advertisement
Tags :
Sindhudurg Court Narayan Rane Nitesh Rane Sindhudurg District Bank Sindhudurg District Bank Election