ABP News

Sindhudurg Chipi विमानतळाच्या उद्घाटनामध्ये अपशकुन करू नये : Pravin Darekar

Continues below advertisement

चिपी विमानतळाचं उद्घाटन होऊन कोकणवासियांना फायदा होणार असेल तर त्यामध्ये अपशकुन करू नये अशी टीका विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर कली आहे. तसेच मुख्यमंत्री ठाकरे यांना बोलवायचं की नाही याबाबत केंद्रीय मंत्रायल ठरवेल. त्यांना बोलावल्यास त्यास विरोध असण्याचं कारण नाही असं देखील दरेकर यांनी म्हटलं आहे. तर, काँग्रेसच्या काळात ईडीचा वापर कसा झाला होता हे पाहा. ईडी काही चुकीचं करत असेल तर त्याला न्यायपालिका पाहून घेईल असं उत्तर दरेकर यांनी शरद पवार यांच्या टिकेला दिलं आहे. तर, सहकार क्षेत्र कुणाच्या हातात आहे, त्याचं वाटोळं कुणी केलं असं देखील दरेकर यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांनी सहकार क्षेत्र संपवण्याचा घाट असल्याच्या केलेल्या टिकेला त्यांनी हे उत्तर दिलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कथनी आणि करणीमध्ये फरक आहे, सध्या आरोग्य सेविकांना कमी केलं जात आहे असं देखील दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंदिरं उघडू कि रूग्णालयं? या भाजपला लगावलेल्या टोल्याला उत्तर देताना सांगितलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram