Sindhudurg Chipi Airport : चिपी विमानतळावर नाईट लॅण्डिंग विमान सेवा सुरु होण्याचा मार्ग मोकळा
abp majha web team
Updated at:
16 Nov 2023 05:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSindhudurg Chipi Airport : चिपी विमानतळावर नाईट लॅण्डिंग विमान सेवा सुरु होण्याचा मार्ग मोकळा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावर 'नाईट लॅण्डिंग' यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे या विमानतळावरुन 'नाईट लॅण्डिंग' विमान सेवा सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच दिल्ली इथलं 'डीजीसीए'चं पथक चिपीला येऊन नाईट लँडिंग सुविधेची तपासणी करुन ही सेवा सुरु करण्यास अंतिम मंजुरी देणार आहे. दरम्यान, फ्लाय-९१ या विमान सेवा देणाऱ्या कंपनीने सिंधुदुर्ग विमानतळावरुन नाईट लॅण्डिंग'मुळे सेवा देण्यास अनुकुलता दर्शवली आहे. नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याने चिपी विमानतळाला नव संजीवनी मिळण्याची शक्यता आहे.