Sindhudurg : सिंधुदुर्गात जिल्ह्याचा ऐतिहासिक निर्णय, वाड्या-वस्त्यांची जातीवाचक नावे बदलली
Continues below advertisement
कोकणातील सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्याने राज्यात एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील जातीवाचक वस्त्या आणि रस्त्यांची नावे बदलण्याचा महत्वपूर्ण निर्णय प्रशासनाने घेतला असून, असा निर्णय घेणारा सिंधुदुर्ग हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. 'सिंधुदुर्ग जिल्हा हा राज्यातला पहिला असा जिल्हा ठरतोय की ज्यांनी जातीवाचक वस्त्यांची आणि रस्त्यांची नावं बदलण्याचा एक मोठा निर्णय घेतलाय'. पालकमंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे (Trupti Dhodmise) यांनी हा निर्णय जारी केला. याअंतर्गत जिल्ह्यातील एकूण 192 जातीवाचक वस्त्या आणि 25 रस्त्यांची नावे बदलण्यात येणार आहेत. 'हरिजन वाडी', 'चर्मकार वाडी', 'बौद्ध वाडी' अशी नावे आता इतिहासजमा होणार असून, त्याऐवजी महापुरुष आणि लोकशाही मूल्यांशी संबंधित नावे दिली जातील. सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मता वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement