TOP 50 Superfast News : 14 OCT 2025 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha
Continues below advertisement
महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि मनसेच्या (MNS) शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम (S. Chokalingam) यांची भेट घेऊन मतदार याद्यांमधील घोळ आणि व्हीव्हीपॅटच्या (VVPAT) मुद्द्यांवरून आक्रमक भूमिका घेतली. 'प्रत्येकवेळी पराभवानंतर तक्रारींचा पाढा वाचणे हा विरोधकांचा रडीचा डाव आहे', अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली आहे. या भेटीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), शरद पवार (Sharad Pawar) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एकत्र येत आगामी निवडणुका पारदर्शकपणे घेण्याची मागणी केली. कॉ. गोविंद पानसरे (Govind Pansare) हत्या प्रकरणी संशयित आरोपी वीरेंद्रसिंह तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अयोध्येत (Ayodhya) राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांचे (NSG) केंद्र स्थापन करण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (HM Amit Shah) यांनी केली. गडचिरोलीत (Gadchiroli) वरिष्ठ माओवादी नेता मल्लजुला वेणुगोपाळराव उर्फ भूपतीने (Mallujula Venugopalrao alias Bhupati) साठ सहकाऱ्यांसोबत आत्मसमर्पण केल्याची माहिती आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement