ABP News

Sindhudurg : आम्हीच निवडणूक जिंकणार - आमदार वैभव नाईक : ABP Majha

Continues below advertisement

सिंधुदुर्गात जिल्हा बँकेच्या निवडणुकीआधी राजकीय घमासान सुरु आहे आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांना जामीन मिळणार की अटक होणार? याचा फैसला थोड्याच वेळात होणार आहे. त्यांच्या जामीन अर्जावर सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालय आज सकाळी साडेदहा वाजता निर्णय देणार आहे. काल पोलिसांनी नारायण राणेंना नोटीस पाठवून नितेश राणे कुठे आहेत याबाबत विचारणा केली होती. पण राणेंनी पोलीस ठाण्यात हजर राहण्यास नकार दिला होता. आता कोर्ट नितेश राणेंबाबत काय निर्णय देतं यावर पुढच्या घडामोडी अवलंबून आहेत. या पार्श्वभूमीवर आज जिल्हा बँकेच्या निवडणुकीचं मतदान सुरु झालं आहे. या निवडणुकीत नारायण राणेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत
महाविकास आघाडी आणि भाजपचं पॅनल आमनेसामने आहे. सिंधुदुर्गातील या राजकीय घडामोडींकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram