Sindhudurg Anganewadi: आंगणेवाडीच्या यात्रेची तयारी, मंदिर परिसरात विद्युत रोषणाई

Continues below advertisement

Sindhudurg Anganewadi: आंगणेवाडीच्या यात्रेची तयारी, मंदिर परिसरात विद्युत रोषणाई

कोकणातल्या लाखो भाविकांचं श्रध्दास्थान असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडीच्या भराडीदेवीची यात्रा अवघ्या दोन दिवसांवर आली आहे. आंगणेवाडीच्या भराडीदेवीचा उत्सव यंदा शनिवार, दोन मार्चला साजरा होणार आहे. या उत्सवाच्या निमित्तानं राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक आंगणेवाडीत दाखल होत असतात. पण त्यातही मुंबई-ठाणे आणि आसपासच्या महानगरांमधल्या मूळच्या कोकणवासीयांमध्ये भराडीदेवीच्या यात्रेचा उत्साह अधिक असतो. राज्याच्या विविध पक्षांमधील नेतेमंडळीही आवर्जून भराडीदेवीच्या दर्शनाला हजेरी लावतात. या यात्रेची तयारी दरवर्षी महिनाभर आधीपासूनच सुरू होते. त्यामुळं आंगणेवाडीत यात्रेसाठीची दुकानं आणि आजूबाजूचा परिसर एव्हाना छान सजला आहे. व्यापाऱ्यांची लगबग वाढली आहे. भाविकांना देवीचं दर्शन सुलभ व्हावं म्हणून रांगांचं नियोजन करण्यात आलं आहे. मंदिर परिसराला विद्युत रोषणाई करण्यात आली असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यानं संपूर्ण यात्रेवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram