Siddhant Shirsat Controversy : विवाहितेशी संबंध,लग्न आणि धोका!शिरसाटांच्या लेकावर गंभीर आरोप
Siddhant Shirsat Controversy : विवाहितेशी संबंध,लग्न आणि धोका!शिरसाटांच्या लेकावर गंभीर आरोप
राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री व छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट(Siddhant Shirsat) यांचे सुपुत्र सिद्धांत संजय शिरसाट (Siddhant Shirsat) यांच्यावरती एका विवाहित महिलेने गंभीर आरोप केले आहेत. सिद्धांत शिरसाट (Siddhant Shirsat) यांनी आपली फसवणूक केली असून त्यांच्याविरुद्ध मानसिक आणि शारीरिक छळ, फसवणूक, धमकी , हुंडा प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी केली आहे. याबाबत महिलेने सिद्धांत शिरसाट(Siddhant Shirsat) यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.
नेमकं प्रकरण काय?
महिलेने या फ्रकरणी दिलेल्या माहितीनुसार, विवाहित महिलेची ओळख सिद्धांत शिरसाट यांच्याशी 2018 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये संबंध निर्माण झाले आणि चेंबूर येथील एका फ्लॅटवर त्यांच्या प्रत्यक्ष भेटी, तसेच शारीरिक संबंध झाले होते. सिद्धांत शिरसाट यांनी वारंवार आत्महत्येची धमकी देऊन ब्लॅकमेल करत तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकला आणि सिद्धांत शिरसाट यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवून लग्न केल्याचा आरोपही महिलेने केला आहे.