Solapur Bus In Rain : बोनटपर्यंत पाणी, बसही झाली बंद; सोलापुरात पुलाखाली अडकली एसटी

Solapur Bus In Rain : बोनटपर्यंत पाणी, बसही झाली बंद; सोलापुरात पुलाखाली अडकली एसटी

 मुसळधार पावसामुळे रेल्वे पुलाखाली साचलेल्या पाण्यात बस अडकली   पोलिस आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला, बार्शीतला प्रकार   काल रात्री तुळजापूर-बार्शी रोडवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस पावसाच्या पाण्यात अडकली  तुळजापूरहून बार्शीच्या दिशेने रवाना झाली होती बस  मात्र बार्शी शहरापासून दोन किलोमीटरवर असलेल्या रेल्वे पुलाखाली ही बस अडकली   प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने अक्षरशः महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये शिरलं पाणी  बस मध्ये पाणी शिरल्यामुळे बस बंद पडली. अचानक पाणी बसमध्ये शिरू लागल्याने प्रवाशांच्या चिंतेत काही वेळासाठी भर पडली होती  मात्र बार्शी शहर पोलीस आणि अग्निशमन दलाने तत्परता दाखवत या सर्व 27 प्रवाशांना बाहेर काढलं   बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास घेतला   दरम्यान बस मध्येच बंद पडल्यामुळे काही वेळ तुळजापूर - बार्शी रोडवरील वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola