Sidco Home Lottery : दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सिडकोच्या घरांचा धमाका, 40 हजार गरांची लॉटरी निघणार
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSidco Home Lottery : दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सिडकोच्या घरांचा धमाका, 40 हजार गरांची लॉटरी निघणार
सिडकोने रेल्वे स्थानकाशेजारी उभारलेल्या घरांची लॅाटरी निघणार आहे. येत्या दसर्याला सिडको धमाका करणार असून घर घेणारांसाठी ही सुवर्ण संधी आहे. सिडकोने आज पर्यंत रेल्वे स्थानका शेजारी उभारलेल्या घरांची लॅाटरी कधीच काढली नव्हती. मात्र या वेळेला दसर्याच्या शुभ मुहूर्तावर ४० हाजार घरांची लॅाटरी निघणार आहे. सिडकोने वाशी, सानपाडा, जुईनगर, खांनेदेश्वर , नेरूळ या मोक्याच्या ठिकाणी घरे बांधली आहेत. सद्या ६७ हाजार घरांचे काम सुरू असून ४० हाजार घरे पुर्णत्वास आली आहेत. घरांबरोबर सिडकोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कामही प्रगतीपथावर आणले आहे. एक रनवे पुर्ण झाला असून दुसर्याचे काम सुरू आहे. काही दिवसात येथून सुखोई विमानाची चाचणी केली जाणार आहे. याबाबत सिडको एमडींशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विनायक पाटील यांनी