Antarwali Sarati Strike : आंतरवाली सराटीत तीन आंदोलन, मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा तिसरा दिवस
Antarwali Sarati Strike : आंतरवाली सराटीत तीन आंदोलन, मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा तिसरा दिवस
मनोज जरांगे यांच आंदोलन सुरू असताना भावाने घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची छत्रपती संभाजीनगर येथे भेट घेऊन दिले निवेदन...
17 सप्टेंबर ला झाली भेट
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे पुन्हा एकदा आमरण उपोषण अंतरवली सराटी येथे चालू आहे मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळावं आणि सग्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी मनोज जरांगे हे सध्या उपोषण करत आहेत मात्र दुसरीकडे त्यांचे मोठे बंधू भाऊसाहेब रावसाहेब जरांगे यांनी दिनांक 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन एक निवेदन देण्यात आलेल आहे त्या निवेदनामध्ये त्यांनी जायकवाडी प्रकल्पातील पाणी सिंदफणा नदी पात्रात सोडण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांन समवेत घेऊन केली आहे..
मनोज जरांगे पाटलांच उपोषण सुरू असताना भावाने देखील उपोषणाचा हत्यार उपसल आहे मनोज जरांगे यांचे बंधू भाऊसाहेब रावसाहेब जरांगे हे बीड जिल्ह्यातील साक्षाळ पिंपरी येथे मध्ये वास्तव्यात आहेत मनोज जरांगे.. मनोज जरांगे पाटलांनी गेल्या वर्षेभरामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून उपोषण केले आहे त्यांनी शेतकऱ्यांसाठी देखील पुन्हा आपण उपोषण करणार असल्याची घोषणा केली होती मात्र आता त्यांचे मोठे भाऊ भाऊसाहेब रावसाहेब जरांगे यांनी जायकवाडी प्रकल्पातील पाणी सिंदफणा नदी पात्रात सोडण्यात यावे अशी मागणीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिना दिवशी केली आहे यावेळी त्यांनी जर मागणी लवकरात लवकर जर मान्य नाही केली तर आपण शेतकऱ्यांना घेऊन उपोषण करणार असल्याचे देखील निवेदना मध्ये म्हटले आहे..
भाऊसाहेब जरांगे यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला आहे