IND-WI Series: भारतानं वेस्टइंडिजविरुद्धची दुसरी टेस्ट आणि मालिका जिंकली

Continues below advertisement
टीम इंडियाने (Team India) वेस्ट इंडिजवर (West Indies) मिळवलेल्या कसोटी मालिका विजयाची आणि कर्णधार शुभमन गिलच्या (Shubman Gill) कामगिरीची सध्या सर्वत्र चर्चा आहे. कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतानं मिळवलेला हा पहिलाच मालिका विजय ठरला आहे. दिल्ली कसोटीत (Delhi Test) टीम इंडियानं वेस्ट इंडिजचा सात विकेट्सनी धुव्वा उडवत मालिका खिशात घातली. अहमदाबादमधील (Ahmedabad) विजयानंतर दिल्लीतही विजय मिळवून भारताने मालिकेत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. वेस्ट इंडिजने दिलेले २१ धावांचे सोपे आव्हान भारताने ३ विकेट्स गमावून पूर्ण केले. सलामीवीर लोकेश राहुलने (KL Rahul) ५८ तर साई सुदर्शनने (Sai Sudarshan) ३९ धावांचे योगदान दिले. या कसोटीत आठ विकेट्स घेणारा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) सामनावीर, तर अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या रवींद्र जाडेजाला (Ravindra Jadeja) मालिकावीराचा बहुमान मिळाला. शुभमनने या मालिकेत एक शतक आणि एका अर्धशतकासह १९२ धावा केल्या.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola