Nilesh Ghaywal Case : कोथरुड गोळीबार प्रकरणी निलेश घायवळची मुंबईत हायकोर्टात याचिका
Continues below advertisement
पुण्यातील कोथरुड गोळीबार प्रकरणी (Kothrud Firing Case) मकोका (MCOCA) अंतर्गत झालेल्या कारवाईविरोधात गँगस्टर निलेश घायवळने (Nilesh Ghaywal) मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून, मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर (Chief Justice Shree Chandrashekhar) यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी होणार आहे. 'मीडिया ट्रायलमुळे (Media Trial) आपल्याविरोधात कारवाई झाली', असा गंभीर आरोप निलेश घायवळने याचिकेतून केला आहे. घायवळ आणि त्याच्या टोळीतील सदस्यांवर कोथरुडमधील गोळीबारानंतर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. या कारवाईला आव्हान देत, आपल्यावर अटकेची कारवाई केली जाऊ नये, अशी मागणी घायवळने याचिकेद्वारे केली आहे. घायवळ सध्या फरार असून तो परदेशात असल्याची माहिती आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement