Shubhan Sengupta First Neet Exam | 720 पैकी 720! पुनर्निकालामध्येही शुभान देशात पहिल्या क्रमांकावर
Shubhan Sengupta First Neet Exam | 720 पैकी 720! पुनर्निकालामध्येही शुभान देशात पहिल्या क्रमांकावर
नीट च्या परीक्षेची काठीण्य पातळी वाढवा... नीट संदर्भात निर्माण झालेल्या गोंधळामुळे तेव्हा टॉपर असूनही सेलिब्रेट करत आलं नाही आता नक्कीच सेलिब्रेट करू... नीट च्या परीक्षेत देशात पहिला क्रमांक पटकावणाऱ्या शुभान सेनगुप्ता चा मत... नीटच्या परीक्षे संदर्भात जो काही गोंधळ निर्माण झाला होता, तो या परीक्षेच्या पुनर्निकालानंतर काहीसा दूर झाला आहे... नागपूरचा शुभान सेनगुप्ता चार जूनला पहिल्यांदा निकाल आला, तेव्हाही 720 पैकी 720 गुणांसह देशात पहिला होता... पुनर्निकाला मध्ये ही शुभान सेनगुप्ता पहिल्या क्रमांकावरच कायम आहे (त्याने पुनर्परीक्षा दिलेली नाही). त्यामुळे नीट च्या परीक्षेत संदर्भात गेले 50 दिवस जो काही गोंधळ झाला होता, त्यामुळे देशात पहिला येऊनही तेव्हा सेलिब्रेट करता आलं नव्हतं... आता मात्र आम्ही सेलिब्रेट करू असं शुभान सेनगुप्ताचं म्हणणं आहे... दरम्यान नीट च्या परीक्षेचा यंदाचा पेपर फार सोपा होता नीट सारख्या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेची काठीण्य पातळी वाढवली पाहिजे असं शुभानला वाटतंय... तसेच एंटीएने या परीक्षे संदर्भातील पारदर्शकताही वाढवावी कारण देशातील लाखो विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबीय या परीक्षे संदर्भात प्रचंड अपेक्षा ठेवून असतात असं शुभानचं म्हणणं आहे...