Shubham Lonkar : सिद्दीकी प्रकरणातील आरोपी शुभम लोणकर फरार; लूकआऊट नोटीस जारी -सूत्र

Continues below advertisement

Shubham Lonkar : सिद्दीकी प्रकरणातील आरोपी शुभम लोणकर फरार; लूकआऊट नोटीस जारी -सूत्र

राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar)  गटाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddique)  यांच्या हत्येने संपूर्ण देशात खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलीस अत्यंत बारकाईने तपास करत आहेत.  बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात प्रत्येक क्षणाला नवनवीन अपडेट समोर येत आहेत. त्यात आता खळबळजनक माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दीकींच्या हत्येसाठी फुलप्रुफ प्लान करण्यात आला आहे. बाबा सिद्दिकीच्या हत्येसाठी आरोपींना एक दोन नव्हे तर 65 गोळ्या पुरवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

बाबा सिद्दिकींना मारण्यासाठी फुलप्रुफ तयारी करण्यात आली आहे.   हत्येच्यावेळी  शुटर्सला बुलेट्स कमी पडू नये यासाठी भरपूर बुलेट्स देण्यात आल्या होत्या. आरोपींना बंदुकीच्या  65 गोळ्या (लाईव्ह बुलेट्स) देण्यात आल्या होत्या. पोलीस सूत्रांन दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी एकूण सहा गोळ्या (एम्प्टी बुलेट शेल मिळाले)  चालवण्यात आल्या.  गुरमेल सिंह आणि धर्मराज सिंह यांच्या दोन हत्यारे आढळली. यामध्ये एक पिस्तूल ऑस्ट्रिया मेड आणि दुसरा देसी कट्टा होता. आरोपींकडे पोलिसांना 28 गोळ्या (लाईव्ह बुलेट्स) मिळाल्या. बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर तीन दिवसांनी  जिथे हत्या करण्यात आली तिथे एक काळ्या रंगाची बॅग सापडली. या बॅगमध्ये एक टर्किशमेड  7.62 बोरची पिस्टल आणि 30 लाईव्ह बुलेट्स हस्तगत करण्यात आले. या बॅगमध्ये दोन आधारकार्ड देखील मिळाले.एका आधारकार्डवर सुमीत कुमार लिहिले आहे आणि त्यावर फोटो शिवकुमारचा फोटो आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram