Shrirang Barne महायुतीचा धर्म पाळणार,शिवसेना सुनील शेळकेंसोबत

Shrirang Barne  महायुतीचा धर्म पाळणार,शिवसेना सुनील शेळकेंसोबत
महायुती चे अधिकृत उमेदवार म्हणून सुनील शेळके यांच्या नावाची घोषणा झाली. त्यानंतर  भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देत बंडखोर अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांना पाठिंबा जाहीर केला. मात्र या सगळ्यात महायुती मधील घटकपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटात शांतता दिसून येत होती. शिंदे गटाकडून कोणतीच भूमिका घेण्यात आली नव्हती. आज शिंदे गटाचे मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी भूमिका स्पष्ट करत महायुतीचा धर्म पाळत आमदार सुनील शेळके यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे आता एकटे पडलेल्या सुनील शेळके यांना यानिमित्ताने राजकीय बळ मिळाले आहे. 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola