Shrikant Shinde Thane : अवधूत गुप्ते यांचे टोकदार प्रश्न, श्रीकांत शिंदेंची बेधडक उत्तरं
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppShrikant Shinde Thane : अवधूत गुप्ते यांचे टोकदार प्रश्न, श्रीकांत शिंदेंची बेधडक उत्तरं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची आज (24 फेब्रुवारी) ठाण्यातील युवा सेनेच्या युवा महोत्सवामध्ये प्रकट मुलाखत घेण्यात आली. ही मुलाखत गायक अवधुत गुप्ते यांनी घेतली. यावेळी श्रीकांत शिंदे यांनी गुवाहाटीला जाण्यापासून ते पार बालपणापर्यंत अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी श्रीकात यांनी अनेक राजकीय टिपण्णी करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. ठाण्यामधील चर्चेत असलेल्या लोकसभेच्या उमेदवारीवरही त्यांना प्रश्न विचारण्यात आला. आदित्य ठाकरे यांनी अलीकडेच कल्याण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला होता. या दौऱ्यामध्ये बोलताना आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात रणशिंग फुंकताना राजीनामा द्या, तुमच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी सज्ज असल्याचे जाहीर आव्हान दिले होते. याच आव्हानाचा संदर्भ घेत अवधूत गुप्ते यांनी राजीनामा द्या निवडणुकीला सामोरे जा यांकडे कसे बघता असा प्रश्न श्रीकांत शिंदे यांना विचारला.