Shrikant Shinde on Malanggad : तुमची इच्छा पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

Shrikant Shinde on Malanggad : तुमची इच्छा पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही 

कल्याण तालुक्यातल्या उसाटणे गावामधल्या हरिनाम सप्ताहात खासदार श्रीकांत शिंदे यांनी मलंगगडाविषयी भाष्य करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच भावना पुन्हा व्यक्त केली. तुमच्या मनातली मलंगगडाविषयीची इच्छा मला माहिती आहे. ती पूर्ण झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी हरिनाम सप्ताहाच्या उद्घाटन सोहळ्यात वारकऱ्यांना संबोधित करताना म्हटलं होतं. त्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनीही काल हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात वारकऱ्यांना संबोधित करताना तुमच्या मनातली इच्छा येणाऱ्या काळात पूर्ण होईल, असं म्हटलं. मुख्यमंत्र्यांनी आपल्या मनामधली मलंगडाबद्दलची इच्छा पहिल्याच दिवशी बोलून दाखवली आहे, याकडे त्यांनी वारकऱ्यांचं लक्ष वेधलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola