Shegaon : शेगावच्या संत गजानन महाराज मंदिरात केवळ ऑनलाईन पासधारक भाविकांनाच प्रवेश ABP Majha
शेगावच्या संत गजानन महाराज मंदिरात फक्त ऑनलाईन पासधारक भक्तांनाच दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे शेगावमध्ये भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंदिरात गर्दी टाळण्यासाठी प्रशासनानं आधीच उपाययोजना सुरू केल्यात. मंदिरात दररोज फक्त ९ हजार भाविकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे दूरवरून येणाऱ्या भक्तांनी आधीच ऑनलाईन पास काढून यावं, असं आवाहन करण्यात आलंय. मंदिरात दहा वर्षांखालील आणि साठ वर्षांवरील नागरिकांना प्रवेश दिला जाणार नाही, हेदेखिल स्पष्ट करण्यात आलंय.