Corona रुग्णसंख्या नियंत्रण असणाऱ्या भागांमध्ये दुकान रात्री 8 पर्यत सुरु राहणार : Uddhav Thackeray

मुंबई : कोरोना रुग्णवाढ राज्यात कमी होत नसल्यानं राज्यातील काही जिल्ह्यात निर्बंध अद्यापही कडक आहेत. मुंबईत देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचं बंधन अद्याप आहेच. मुंबई लोकल केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच सुरु आहे. यात सर्वसामान्य लोकांकडून सर्वांसाठी लोकल सुरु करण्याची मागणी होत आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगलीमध्ये महत्वाचं भाष्य केलं आहे. लोकलच्या बाबतीत आपण लगेच निर्णय घेत नाहीयेत, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. सांगली येथे पूर परिस्थितीची आढावा बैठक घेऊन नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी ते बोलत होतील.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola