Shopian Encounter : जम्मू- काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत सांगलीचा सुपुत्र रोमीत चव्हाण शहीद
Continues below advertisement
सांगली : जम्मू- काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शिगाव गावचा 23 वर्षीय रोमीत तानाजी चव्हाण शहीद झालाय. जम्मू- काश्मिरमधील शोपियांमध्ये झालेल्या चकमकीत दोन सुरक्षा जवान शहीद झाले. या शहीद जवानांमध्ये रोमितचा समावेश आहे. या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. शोपियां जिल्ह्यातील जैनापुरातील चेरमार्ग भागात आज दुपारी ही चकमक झाल्याची माहिती मिळत आहे.
Continues below advertisement