Human-Tiger Conflict: 'वाघ इतरत्र पाठवा', Devendra Fadnavis यांच्या काकू Shobha Fadnavis यांची मागणी
Continues below advertisement
चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात वाढत्या मानव-वाघ संघर्षावर (Human-Tiger Conflict) माजी मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू शोभा फडणवीस (Shobha Fadnavis) यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. 'आपल्याला जर लोकांचे जीव वाचवायचे असेल तर फॉरेस्ट आणि जनता यांच्यामध्ये जसा संवाद होता पाहिजे तसं वाघाची संख्या कमी करणं अत्यंत आवश्यक आहे,' असे स्पष्ट मत त्यांनी मांडले. गेल्या नऊ दिवसांत जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यात चार जणांचा बळी गेल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. चंद्रपूरमध्ये सुमारे ३५० वाघ असून, ते मानवी वस्तीजवळ येत असल्याने संघर्ष वाढला आहे. ताडोबाच्या (Tadoba) बफर क्षेत्रातील वस्त्यांचे स्थलांतरण कायद्यानुसार शक्य नसल्याने, येथील अतिरिक्त वाघ सह्याद्री (Sahyadri) आणि मेळघाट (Melghat) सारख्या कमी वाघ असलेल्या व्याघ्र प्रकल्पांमध्ये स्थलांतरित करावेत, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement