Farmers Protest : 'मुंबईला बोलावून अटक करण्याचा सरकारचा डाव होता', बच्चू कडूंचा सरकारवर गंभीर आरोप

Continues below advertisement
शेतकरी नेते बच्चू कडू (Bachchu Kadu) आणि सरकार यांच्यातील नियोजित बैठक रद्द झाल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या बैठकीकडे शेतकरी नेत्यांनी पाठ फिरवल्याने ती रद्द करावी लागल्याचे सरकारचे म्हणणे आहे. 'मुंबईला बोलावून अटक करण्याचा सरकारचा डाव होता, म्हणूनच आम्ही बैठकीला गेलो नाही,' असा गंभीर आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. तर, रात्री उशिरा मेसेज करून नागपुरात शेतकरी जमल्याने बैठकीला येऊ शकत नाही, असे कळवल्याने बैठक रद्द केल्याचे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, शेतकरी नेते किशोर तिवारी (Kishore Tiwari) यांनी बच्चू कडूंच्या हेतूबद्दल शंका उपस्थित करत त्यांना 'अज्ञानी' म्हटले आहे. दरम्यान, विरोधी पक्षांनी कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असून, 'सातबारा कोरा' करण्याच्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या घोषणेची आठवण करून दिली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola