रामदास कदमांच्या जागेवर नव्या उमेदवाराचा शोध सुरू? Audio Clip मुळे Ramdas Kadam अडचणीत
शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्या जागेसाठी नव्या उमेदवारांचा शोध सुरू आहे. कदम हे विधानपरिषदेचे आमदार आहेत त्यांची विधान परिषदेची मुदत जानेवारी 2022 मध्ये संपतेय. त्यांचे सदस्यत्व पुढे कायम ठेवलं जाणार नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. कथित ऑडिओ क्लिपनंतर ठाण्यातील बॅनरबाजीमुळे रामदास कदम अडचणीत आलेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ज्यांचा पक्षाला उपयोग होईल, जो तळागाळात लोकांशी संपर्कात असेल आणि जो पक्षाच्या नियमावलीच्या पुढे जाणार नाही असा कार्यकर्ता शोधण्याचं काम सध्या सुरू आहे अशी माहिती मिळतेय. यांत मुंबईच्या काही विभागप्रमुख किंवा युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचीसुद्धा वर्णी लागू शकते.