Amravati : शेतकरी मदतीवरून Yashomati Thakur विरुद्ध Ravi Rana वाद
अमरावती जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार रवी राणा यांनी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याच्या मुद्द्यावरुन चांगलाच राडा घातलाय. जिल्हा नियोजन बैठक सुरु होताच रवी राणा यांनी अमरावतीतील शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी मदत टाकावी, अशी मागणी करणारा ठराव पारित करावा अशी आग्रही मागणी केली. त्यावरुन पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि रवी राणा यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.