Pandharpur : 'मटण, पैसे वाटून लढवली होती निवडणूक', शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांचा गौप्यस्फोट
साखर कारखाना निवडणूक म्हणजे पैशांचा महापूर असं बोललं जातं. मात्र या वाक्यात तथ्य असल्याचं कबूल करत शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांनी गौप्यस्फोट केलाय. 1998 साली झालेल्या सांगोला कारखाना निवडणुकीत मताला तीन हजार रुपये वाटले आणि मटणाच्या पार्ट्या दिल्या असं वक्तव्य पाटील यांनी केलंय. सहकार मंत्र्यांसमोरच शहाजीबापू पाटील यांनी साखर कारखाना निवडणुकांचे वाभाडे काढले.