“कोरोनाचे जंतू सापडले असते तर देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबले असते” : संजय गायकवाड
बुलढाणा : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच दिवसागणिक कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. झपाट्यानं वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे राज्यात आरोग्य यंत्रणेवरही ताण आला आहे. राज्यात बेड्स, ऑक्सिजन आणि लसींचा तुटवडा निर्माण होत आहेत. अशातच कोरोना संकटात जनतेचे हाल होत आहेत आणि राजकीय नेते राजकारणात दंग आहेत. या राजकीय चिखलफेकीत बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी काल मर्यादा ओलांडत भाजप नेत्यांवर टीका केली आहे. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.