Chipi Airport : नारायण राणेंच्या इशार्यावर शिवसेनेचा पलटवार, अनिल देसाई, अरविंद सावंत यांचा घणाघात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Oct 2021 01:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं आज उद्घाटन होणार आहे. अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या या विमानतळाचं आज लोकार्पण होतंय. पण हा कार्यक्रम राणे आणि शिवसेना यांच्यातल्या वादाची नांदी ठरण्याची शक्यता आहे. कारण खुद्द नारायण राणे यांनीच उद्याच्या लोकार्पण कार्यक्रमात शिवसेनेच्या नेत्यांबद्दल मोठा गौप्यस्फोट करण्याचा इशारा दिलाय. त्यावर आता शिवसेनेच्या नेत्यांनी ही पलटवार केला आहे.