Coronavirus| Sanjay Raut PC| कोरोनावरून राजकारण करणाऱ्या भाजप नेत्यांना क्वारेन्टाइन करा : संजय राऊत
कोरोनावरून राजकारण करणाऱ्या भाजप नेत्यांना प्रबोधिनी म्हाळगीमध्ये क्वारेन्टाइन करा, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. अशा संकटाच्या काळात सरकारच्या खांद्याला खांदा लावून विरोधी पक्षाने लढण्याची गरज असते. एवढा शहाणपणा विरोधी पक्षाकडे नसेल तर महाराष्ट्राच्या राजकारणात काम करण्याचा त्यांना अधिकार नाही, असा घणाघातही राऊत यांनी विरोधी पक्षावर केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने सर्वांना सोबत घेऊन कोरोनाशी युद्ध लढत आहे. हे देशात कधीही घडताना दिसले नाही. मात्र, ज्यांना याचं राजकारण करायचं आहे, अशा भाजप नेत्यांसाठी पंतप्रधान मोदींनी शिबीर घेऊन शिकवण्याची गरज असल्याची टीका राऊत यांनी केली.