Sanjay Pawar cried Kolhapur: Shiv Sena नेते संजय पवार हमसून हमसून रडले, दोन्ही खासदारांना थेट आव्हान

Continues below advertisement

कोल्हापूरचे दोन्ही खासदार शिंदे गटासोबत गेल्यानंतर शिवसैनिकांना अश्रू अनावर झाले आहेत...शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार हे एबीपी माझाशी बोलताना ढसाढसा रडले आहेत...कारण बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र शिवसैनिक राबले आहेत... दोन्ही खासदारांच्या बद्दल शिवसैनिकांमध्ये प्रचंड चीड देखील पाहायला मिळते... संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांनी उद्धव ठाकरे यांना फसवलं आहे...उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे खंजीर खुपसला आहे... त्यामुळे कोल्हापूरची जनता आणि शिवसैनिक या दोघांना आता माफ करणार नाहीत..2024 ची लोकसभा डोळ्यासमोर ठेवून यांनी निर्णय घेतला आहे, त्या लोकसभा निवडणुकीमध्ये कसे निवडून येतात तेच आम्ही पाहणार आहोत असे देखील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले आहेत...त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram