ABP News

Shivsena on Kunal Kamra Rada : कुणाल कामराच्या स्टुडिओची शिवसेनेकडून तोडफोड

Continues below advertisement

Kunal Kamra Triggers Row Sings Song: स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामरा (Kunal Kamra) याच्याविरोधात सध्या टीकेची झोड उठली आहे. मुंबईतील (Mumbai News) खारमधील शोमध्ये कुणालनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Deputy CM Eknath Shinde) यांच्यावर एक विडंबनात्मक गाणं गायलं आणि वादाला सुरुवात झाली. कुणालनं गायलेल्या गद्दार नज़र वो आए... गाण्यानं राज्याचं राजकारण ढवळून निघालं. एकनाथ शिंदेंवरील विडंबनात्मक गाण्यामुळे शिवसैनिक संतापले आणि थेट खारमध्ये (Khar Roda Bandra) ज्या ठिकाणी शो पार पडला, त्या ठिकाणी जाऊन पोहोचले. स्टुडिओची तोडफोड केली आणि कुणाल कामराला माफी मागण्यासाठी अल्टीमेटम दिलं. तसेच, कुणालविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला. कुणाल कामराच्या विडंबनात्मक गाण्यामुळे शिवसैनिकांसोबत शिवसेनेच्या आमदार, खासदारांच्या भावनाही दुखावल्या गेल्यात. अनेकांनी कुणाल कामराचा समाचार घेतला आहे, तर अनेकांनी कुणालला थेट इशाराही दिला आहे. पण, हे सर्व प्रकरण नेमकं कसं सुरू झालं? कुणाल कामरा नेमकं म्हणाला तरी काय? त्यानं गायलेलं विडंबनात्मक गाणं होतं तरी काय? 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram