Shivsena Candidate List Declare : शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर ; कुणाला मिळाली संधी ?
Shivsena Candidate List Declare : शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर ; कुणाला मिळाली संधी ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीनं आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आठ उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली. दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांच्यासह विद्यमान सात खासदारांना शिंदे गटाकडून आगामी निवडणुकीसाठी पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. रामटेक मतदारसंघात मात्र खासदार कृपाल तुमाने यांचं तिकीट कापून, त्यांच्याऐवजी राजू पारवे यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे मतदारसंघात, त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघात आणि खासदार गजानन कीर्तिकरांच्या वायव्य मुंबई मतदारसंघात कुणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय शिवसेनेच्या पहिल्या यादीत घेण्यात आलेला नाही. तसंच खासदार राजेंद्र गावितांच्या पालघर, खासदार हेमंत गोडसेंच्या नाशिक आणि खासदार भावना गवळी यांच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात कुणाला उमेदवारी मिळणार हा प्रश्नही अजून अनुत्तरित आहे.