ShivSavad and Shivgarjana vs ShivDhanushya : शिवसंवाद, शिवगर्जना यात्रेला 'शिवधनुष्य' ने उत्तर

उद्धव ठाकरे गटाच्या शिवसंवाद आणि शिवगर्जना यात्रेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून शिवधनुष्य यात्रेनं उत्तर देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या शिवधनुष्य यात्रेला लवकरच महाराष्ट्रात सुरुवात होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेल्या निकालानंतर शिंदेंच्या पक्षाला मिळालेलं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह त्यांचा पक्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेणार आहे. त्याआधी मार्चअखेरीस अयोध्यावारी करण्याबाबत शिंदे गटाकडून आखणी सुरू झाली आहे. अयोध्येतून धनुष्यबाण आणून तो यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान, माझा धनुष्यबाण या घोषवाक्यानं शिवसेनेकडून शिवधनुष्य यात्रेचं आयोजन करण्यात येईल.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola