Shivbhojan Thali: CCTV कॅमेरे बसवण्यासाठी शिवभोजन केंद्राच्या संचालकांना 31 जानेवारीची डेडलाईन ABP Majha
Continues below advertisement
शिवभोजन थाळीच्या नावाखाली दलालांनी पैसे लाटल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात केला होता. या आरोपांनंतर राज्य सरकारने सर्व शिवभोजन थाळी केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश दिलेत. हे कॅमेरे बसवण्यासाठी शिवभोजन केंद्राच्या संचालकांना ३१ जानेवारीपर्यंतची डेडलाईन देण्यात आलीय. एकाच ग्राहकाचे छायाचित्र वेगवेगळ्या नावांनी वापरून सरकारच्या दलालांनी शिवभोजन थाळी योजनेचे पैसे लाटल्याचा आरोप करण्यात आला होता. शिवाजी महाराजांच्या नावे योजनेत भ्रष्टाचार होत असून, हा महाराजांचा अपमान असल्याचा हल्लाबोल फडणवीस यांनी केला होता.
Continues below advertisement
Tags :
Devendra Fadnavis State Government Money Allegations Winter Session Thali Shivbhojan Leader Of Opposition Allegations