Shivbhojan Crisis: 'दिवाळी अंधारात गेली', 8 महिन्यांपासून अनुदान थकल्याने शिवभोजन चालक आक्रमक
Continues below advertisement
राज्यातील गोरगरिबांसाठी असलेली शिवभोजन थाळी योजना (Shiv Bhojan Thali scheme) अनुदानाच्या प्रचंड थकबाकीमुळे संकटात सापडली आहे. केंद्र चालकांना गेल्या आठ महिन्यांपासून पैसे न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून अनेक केंद्र बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. 'आम्हीही शिवभोजन थाळीसाठी आलेल्या लोकांना वेठीस ठेवल्यास सरकार आमचे पैसे देईल का?', असा संतप्त सवाल शिवभोजन थाळी चालकांनी केला आहे. शासनाकडे सुमारे २०० कोटी रुपयांची थकबाकी असल्याने अनेक केंद्रचालकांनी कर्ज काढून व्यवसाय सुरू ठेवला आहे, मात्र आता तेही शक्य होत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) चालकांनी दिवाळी अंधारात गेल्याचे सांगत सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने तातडीने पैसे न दिल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement