Shiv Thackeray : मराठी 'बिग बॉस 2'चे विजेता शिव ठाकरे याच्या गाडीला अपघात, शिव किरकोळ जखमी

Continues below advertisement
एका खासगी मराठी वाहिनीवरील 'बिग बॉस 2'चे विजेते अमरावतीकर शिव ठाकरे यांच्या कारला मागून आलेल्या वाहनाने धडक दिली.  या अपघातात शिव ठाकरे यांच्या डोक्यावर (डोळ्याच्या वर) दुखापत झाली आहे. आता त्यांची प्रकृती ठिक असून, ते अमरावती येथे घरी विश्रांती घेत आहेत. शिव ठाकरे, त्यांचे जावई, बहीण आणि भाचा हे कारने शनिवारी सकाळी अमरावती वरुन परतवाडा येथे कामानिमित्त निघाले होते. परतवाडा मार्गावरच असलेल्या वायगाव येथील गणपतीचे दर्शन घेऊन शिव त्यांचा नातेवाइकांसह पुढील प्रवासाला निघाले होते. दरम्यान, वायगाव फाटा ते आष्टी दरम्यान मागून आलेल्या एका मिनी ट्रॅव्हल्सने शिव ठाकरे यांच्या कारला मागून जोरदार धडक दिली. ही धडक बसताच शिव ठाकरे यांची कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात 300 ते 400 फूट गेली होती. या अपघातात शिव यांचे जावई आणि बहीण यांनासुद्धा किरकोळ दुखापत झाली आहे. याचवेळी शिव यांच्या डोळ्याच्या वरील बाजूला गंभीर दुखापत झाली असून, त्या ठिकाणी टाके लावण्यात आले आहे. आता शिव ठाकरे हे घरी असून त्यांची प्रकृती चांगली आहे शिव ठाकरे हे मुंबईवरून तीन दिवस सुटीच्या काळात अमरावतीत आले होते. शिव यांचे सध्या मुंबईत शुटींग सुरू असून, ते तीन दिवसांसाठी अमरावतीत घरी आले होते. याच सुटीच्या काळात अमरावती ते परतवाडा येथे जात असताना हा अपघात घडला आहे
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram