महागाईविरोधात शिवसेना महिला आघाडीचं आंदोलन, त्रस्त गृहिणींच्या भावना पथनाट्याच्या माध्यमातून सादर
Continues below advertisement
वाढत्या महागाईविरोधात शिवसेनेच्या महिला आघाडीनं रत्नागिरी जिल्ह्यातील हातखंबा इथं आंदोलन केलं. नरेंंद्र मोदी यांनी दिलेली महागाई कमी करण्याची आश्वासनं हवते विरली आहेत. गॅस, पेट्रोल आणि जीवनावश्यक वस्तुंच्या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचं जगणं नकोसं झालं आहे. त्यामुळे आम्ही याचा निषेध करत असल्याच्या भावना यावेळी महिला कार्यकर्त्यांनी बोलून दाखवल्या. यावेळी मोदींच्या फोटो समोर आऱती करत महागाईमुळे त्रस्त गृहिणीच्या भावना पथनाट्याच्या माध्यमातून दाखवल्या गेल्या.
Continues below advertisement
Tags :
Ratnagiri