Afghanistan मधील मशिदीत पुन्हा बॉम्बस्फोट, 32 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू, आठवड्याभरातील दुसरी घटना
Continues below advertisement
अफगाणिस्तानात सलग दुसऱ्या शुक्रवारी शिया समुदायाच्या मशीदीत बॉम्बस्फोट झालेत. दक्षिण अफगाणिस्तानच्या कंदाहार शहरातील शिया मशिदीत झालेल्या या स्फोटांमध्ये 47 जण ठार झाले. तर 50 जण जखमी झाल्याची महिती मिळत आहे. बॉम्बस्फोट कोणी घडवून आणले, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार तीन स्फोट झाले. पहिला, मशिदीच्या मुख्य दरवाजाजवळ, दुसरा दक्षिणेकडील भागात आणि लोक नमाज पठणापूर्वी हातपाय धुतात तेथे तिसरा बॉम्बस्फोट झालेत. याबाबत अफगाणिस्तानच्या अंतर्गत मंत्रालयाचे प्रवक्ते कारी सय्यद खोस्ती यांनी ट्विट करीत दुःख व्यक्त केलंय.
Continues below advertisement