Maharashtra Politics: 'निवडणुका होतील की नाही हीच शंका', Bhaskar Jadhav यांचा सरकारवर गंभीर आरोप

Continues below advertisement
ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी राज्यातील महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘यापुढे निवडणुका होतील की नाही अशी शंकाही भास्कर जाधव यांनी व्यक्त केली आहे’. राज्यात सरकारबद्दल प्रचंड असंतोष असून, त्यांनी प्रत्येक टप्प्यावर परवानग्या बळकावल्याचा आरोप जाधवांनी केला. पक्ष, चिन्ह, आमदार आणि नेते चोरल्यानंतर आता सरकार मतदार चोरण्याचा प्रयत्न करत आहे, अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला. सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास सरकार टाळाटाळ करत होते, परंतु आता कोर्टाच्या आदेशामुळे त्यांची धावपळ उडाली आहे, असेही ते म्हणाले. या निवडणुकांमध्ये पराभव दिसू लागल्यानेच सरकार निवडणुका घेण्यास घाबरत असल्याचा दावा भास्कर जाधव यांनी केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola