Local Body Polls: काँग्रेस स्वबळावर की आघाडी? Sapkal यांच्या अध्यक्षतेखाली आज अंतिम निर्णय

Continues below advertisement
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांच्या अध्यक्षतेखाली आज काँग्रेसच्या संसदीय मंडळाची (Parliamentary Board) महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीसोबत जाणार, यावर या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. दादर येथील टिळक भवन येथे होणाऱ्या या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या बैठकीनंतर काँग्रेस उमेदवारांची घोषणा करणार असल्याचे समजते. 'काँग्रेसकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा चौदा आणि पंधरा नोव्हेंबरला करण्यात येणार आहे,' अशी माहिती माजी अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola