Shinde vs Thackeray : शिवसेनच्या चिन्हासंदर्भातील सुनावणी पुन्हा लांबणीवर, नवी तारीख 12 नोव्हेंबर

Continues below advertisement
शिवसेना पक्ष आणि चिन्हासंबंधीच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोळाव्या क्रमांकावर ही सुनावणी होती आणि अंतिम युक्तिवादाला सुरुवात झाली. उद्धव ठाकरेंच्या वतीने कपिल सिब्बल यांनी आज सुनावणी शक्य नसल्याचे सांगत पुढील तारीख मागितली. त्यानुसार, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 12 नोव्हेंबर रोजी निश्चित केली आहे. ही या प्रकरणातील सर्वात मोठी बातमी आहे. कपिल सिब्बल यांनी युक्तिवादासाठी तीन दिवसांऐवजी फक्त 45 मिनिटे लागतील असे सांगितले. ते म्हणाले, "पंचेचाळीस मिनिटात मी युक्तिवाद करीन." जानेवारीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने लवकर सुनावणीची मागणी कपिल सिब्बल यांनी केली. सर्वोच्च न्यायालयाने सशस्त्र दलांशी संबंधित एका महत्त्वाच्या प्रकरणाची सविस्तर सुनावणी करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे इतर प्रकरणांना कमी वेळ दिला जात आहे. 12 नोव्हेंबर रोजी या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola