Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळाचं लोकार्पण,दि.बा.पाटलांच्या कुटुंबियांना निमंत्रण

Continues below advertisement
नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी दिबा पाटील यांच्या परिवाराला VIP पास देण्यात आले आहेत. दिबा पाटील यांची दोन्ही मुलं, पत्नी आणि बंधू या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्यासाठी गेली तीन-चार वर्षे मोठा संघर्ष सुरू होता. राज्य सरकारने हा प्रस्ताव पास करून केंद्र सरकारकडे पाठवला आहे. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की, पुढील दोन-तीन महिन्यांत या विमानतळाला 'दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट' असे नाव दिले जाईल. आजच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी दिबा पाटील यांच्या परिवाराला पाच VIP पास मिळाले आहेत. गेली पंचवीस वर्षे सुरू असलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अखेर पूर्ण होत आहे. आज उद्घाटन असले तरी, डिसेंबर महिन्यात पहिले विमान उडणार आहे आणि आंतरराष्ट्रीय तसेच देशपातळीवरील सेवा सुरू होणार आहे. दरम्यान, विमानतळाबाहेर उभारण्यात आलेल्या कमानीवर आणि बोर्डावर दिबा पाटील यांचे नाव आधीच दिसत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola