Shiv Sena Symbol Case: 'कोर्टाचीच आता ट्रायल आहे', वकील Asim Sarode यांचे वक्तव्य; SC मध्ये आजपासून अंतिम सुनावणी

Continues below advertisement
शिवसेना (Shiv Sena) पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील वादावर आजपासून सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) अंतिम सुनावणी सुरू होत आहे. निवडणूक आयोगाने (ECI) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Deputy CM Eknath Shinde) यांच्या गटाला मूळ पक्ष आणि चिन्ह दिल्याच्या निर्णयाला शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आव्हान दिले आहे. या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे (Advocate Asim Sarode) यांनी न्यायालयाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 'कोर्ट इज ऑन ट्रायल असं म्हणायला पाहिजे. कोर्टाचीच आता ट्रायल आहे की ते किती लवकर यासंदर्भातला निर्णय देतात,' असे परखड मत ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी व्यक्त केले आहे. यासोबतच, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रकरणावरही सुनावणी होणार असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola